रायगड : लाच घेताना लोकसेवकासह पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला अटक

Published on
Updated on

पनवेल; प्रतिनिधी : तक्रारदार याच्या घराचे घरपट्टी व अ‍ॅसेसमेंट उतारे देण्यासाठी लोकसेवकाने एक लाखाच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 95 हजार रूपये स्‍वीकारताना त्यांच्यासह दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईने सापळा रचून पनवेल एस.टी. स्टॅण्ड परिसरातून ताब्यात घेतले. 

पनवेल जवळील वडघर ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे लोकसेवक दगडू देवरे (वय 54 ग्रामविकास अधिकारी, वडघर) यांनी घरपट्टी व अ‍ॅसेसमेंट उतारे देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात सदर तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन पथक नवी मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. 

यानंतर रविवारी दुपारी पनवेल एस. टी. स्टॅण्डच्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर गाडीमध्ये दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश डाकी (30) यांच्यासह दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news