मुंबई : पुढारी ऑनलाईन
काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीकडून जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता, शैक्षणिक कर्ज शून्य टक्क्याने आदी घोषणा जाहीरनाम्यात केल्या आहेत.
संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नबाब मलिक, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, अनिल गोटे बीआरएसपी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, की आघाडी सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचा वृध्दीदर 13 टक्के होता. आता तो 10.4 टक्क्यांवर आला आहे. यावरून राज्यातील बेरोजगारीने उच्चांक गाठल्याचे स्पष्ट होते.
जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा
जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा
►८० टक्के नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य
►शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
►बेरोजगारांना पाच हजारांचा मासिक भत्ता
►केजी टू पीजी मोफत शिक्षण
►शैक्षणिक कर्ज शुन्य टक्के
►आरोग्य विमा कवच
►कामगारांसाठी २१००० किमान वेतन
►मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ
►सर्वच महापालिकांमध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी