इंद्रायणीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू | पुढारी

इंद्रायणीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा

देहूगाव येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ इंद्रायणी नदी पात्रात पोहण्यास गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा बूडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी ( दि.26 ) घडली.

साहील विजय गौड (10) आणि अखिल विजय गौड ( 8, दोघे रा.सध्या अभिलाषा कन्स्ट्रक्शन देहूगाव, मूळ रा. ग्राम देवर्या देहात,गोरखपूर, उत्तर प्रदेश ) असे बुडून मृत्यू झालेल्या दोघा अल्पवयीन मुलांची नावे आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील परंडवाल चौकामध्ये अभिलाषा नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

‘एसटी’वर आधारित अर्थकारण ठप्प

तेथे काम करणार्‍या विजय हरिलाल गौड या बांधकाम मुजराचे साहील व अखिल ही दोन मुले इंद्रायणी नदीपात्रामध्ये शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मासे पकडण्यास गेले. त्यानंतर ते पोहण्यासाठी नदीपात्रात गेले. पात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे भाऊ बुडू लागले असता, तेथे असणारा त्यांचा मित्र शेखर हा अल्पवयीन मुलगा वाचण्यासाठी गेला; मात्र त्याला देहूतील समीर मनेर याने वाचविले. मात्र साहील व अखिल हे दोघेजण बुडाले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

कोल्हापुरात कोणी कितीही गप्पा मारल्या, आवाज काढला तरी सतेज पाटीलचं निवडून येणार होते

हवेली तहसीलदार गीता गायकवाड, तलाठी अतुल गीते यांनी घटनास्थळाची पाहणी केली.आपत्ती व्यवस्थापनाचे सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाचे 25, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन पथकाचे 6, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पथकाचे 6, तर वन्यजीव रक्षक मावळ पथकाचे दहा कर्मचार्‍याचे घटनास्थळी पाचारण झाले. सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.शवविच्छेदनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आले .याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद दळवी करीत आहे.

देहू नगर पंचायतीचा निवडणूक जाहीर

Back to top button