देहू नगर पंचायतीचा निवडणूक जाहीर | पुढारी

देहू नगर पंचायतीचा निवडणूक जाहीर

पिंपरी : देहूरोड :

देहू नगरपंचायतीची निवडणूक तब्बल दहा महिन्यानंतर जाहीर करण्यात आली आहे. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबरला मतमोजणी होईल.

लाभांश देण्याचे अमिष दाखवून फसवणूक

10 फेब्रुवारी रोजी मुदत संपल्याने ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. 8 डिसेंबर 2021 रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली; पण वारंवार निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून निवडणूक आयोगाने यासंदर्भात पत्र दिले आहे.

वडगाव फाटा येथे मोटार पेटली ; पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्यांची मात्र चांगलीच धावपळ होणार आहे. निवडणुकीसाठी 2011 ची जनगणना कायम धरली आहे. त्यानुसार गावात 17 हजार 158 मतदार असून त्यापैकी 9240 पुरुष आणि 8 हजार 717 महिला आहेत.

             निवडणुकीचा कार्यक्रम

  • 21 नोव्हेंबर : प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर करणे
  • 30 नोव्हेंबर : जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर
  • 1 ते 7 डिसेंबर 2021 : नामनिर्देशन पत्र जमा करण्याचा अवधी
  • 8 डिसेंबर : नामनिर्देशन पत्राची छानणी
  • 21 डिसेंबर : मतदान
  • 22 डिसेंबर : मतमोजणी

कोरोनाचा नवा व्हेरियंट; मंत्री Eknath Shinde यांनी यंत्रणेला दिली ‘ही’ सूचना

Back to top button