जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ शेतकी संघ निवडणुकीत आजी-माजी आमदार समोरासमोर आलेले होते. या दोन्ही दिग्गज आणि त्यांचे आपापली पॅनल या निवडणुकीत उतरली होती. यामध्ये भाजपा प्रणालीत शेतकरी विकास पॅनलचा अकरा जागांवर विजय झाला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार पॅनलने चार जागांवर विजय मिळवला. विजय मिळाल्यामुळे संस्था सभासदांमध्ये दोन जागांसाठी ईश्वर चिट्ठी व्दारा निकाल काढण्यात आला.
भुसावळ शेती संघ मर्यादितच्या निवडणुकीत मध्ये आजी-माजी आमदार समोरासमोर आलेले होते या संघासाठी आज दि. 4 रोजी 59.33% मतदान झालेले होते सकाळी नऊ वाजता भुसावळ येथील खाचऐ हॉल येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली तर सात टेबलांवर मतमोजणी करण्यात आली होती.
या मतदान मोजणी प्रक्रियेत संस्था सभासद यामध्ये उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल काढण्यात आला यावेळी श्रद्धा निलेश सोनवणे या मुलीने ईश्वर चिट्ठी काढून दोन उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.
भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनल यांनी या निवडणुकीत 15 पैकी 11 जागावर विजय मिळवला आहेत. निकाल जाहीर होताच आमदार सावकारे यांचे मतमोजणी ठिकाणी आगमन झाले. विजय कार्यकर्त्यांची हार व गुलालाचा टिक्का लावून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गुलालची मुक्त उधळण केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जगताप, सहकार अधिकारी मनोज डी. चौधरी, सहाय्यक सहकार अधिकारी एस. जी. उचित व व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले.