पुणे, प्रतिनिधी : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची साथ पसरली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत 5 हजार 367 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्याप्रमाणेच चिकुनगुनियाचेदेखील या वर्षी तब्बल 610 रुग्ण आढळून आले आहेत.
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. यामध्ये अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्यामागे दुखणे ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. तर रक्तस्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव— तापाने होते व त्याच्या सोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.जेव्हा सुरुवातीलाच ही लक्षणे दिसून येतात तेव्हा 'एनएस-1' ही संशयित चाचणी केली जाते. मात्र, ही चाचणी पूर्णपणे खात्रीशीर नसते. परंतु, ती पॉझिटिव्ह आल्यास डेंग्यू उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यानुसार उपचार सुरू करण्यास डॉक्टरांना ती उपयोगी ठरते. यामुळे ही चाचणी सुरुवातीच्या टप्प्यासाठी उपयुक्त ठरते. अशी चाचणी केलेले आणि ती पॉझिटिव्ह आलेले असे 5 हजार 367 रुग्ण या वर्षी शहरात आढळून आले आहेत. तर 'आयजीजी' आणि 'आयजीएम' ही चाचणी केलेले जी डेंग्यूचे पक्के निदान करते. असे 1182 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शहरात जानेवारी ते आतापर्यंत विविध आस्थापनांकडून डेंग्यूची पैदास झाल्याप्रकरणी 3 लाख 39 हजार 701 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, शहरात डासांच्या उत्पत्तीची 2 हजार 871 ठिकाणे आढळली असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरे, सोसायटी, खासगी व सरकारी आस्थापना, जवळचा परिसर यांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येत