औरंगाबाद : बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या साहित्य वितरणास सुरुवात

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या साहित्य वितरणास आज (शनिवार) विभागीय मंडळात सुरुवात करण्यात आली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.
त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक आणि मौखिक परीक्षेस 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रात्यक्षिक साहित्याचे वितरण आज (शनिवार) विभागीय शिक्षण मंडळात करण्यात आले. यावेळी उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे प्रतिनिधी यांना साहित्य सुपूर्द करण्यात आले.
साहित्य गोपीनाय आहे. त्याची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी बारावीच्या १ लाख ६८ हजार २६३ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सर्व सुविधा यंदा रद्द करण्यात आल्या आहेत. नेहमीच्या सर्व नियमांचे पालन करत परीक्षा होणार आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :
- चंद्रपूर : ‘ताडोबा’त गाणी वाजवणं पडलं महागात!; वनखात्याचा पर्यटकांना दणक
- Congress Vs Adani : ‘अदानी ग्रुप’ची चौकशी करा – हिंडनबर्ग अहवालानंतर जयराम रमेश यांची मागणी
- हवाई दलासाठी शनिवार ठरला ‘अपघात’वार, दोन घटनांमध्ये तीन विमाने दुर्घटनाग्रस्त