Accident Hingoli : ट्रकची दुचाकीला धडक; 2 जण जागीच ठार | पुढारी

Accident Hingoli : ट्रकची दुचाकीला धडक; 2 जण जागीच ठार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : Accident Hingoli : कळमनुरी ते हिंगोली मार्गावर कळमनुरी नजीक भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

अमोल प्रकाश मोगले, सतीश संभाजी मोगले (दोघे रा. मसोड) अशी मयत तरुणांची नावे आहेत.

Accident Hingoli : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील अमोल मोगले व सतीश मोगले हे दोघेजण त्यांच्या दुचाकी वाहनावर दुपारी कळमनुरी येथे बाजाराच्या निमित्ताने आले होते. रात्री आठ वाजता दोघेही कळमनुरीकडून मसोडकडे निघाले होते. यावेळी हिंगोलीकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (आरजे ०७-जीसी ७४३५) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दोघेही ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले. या अपघातामुळे हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Accident Hingoli : अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोयलावार, जमादार प्रशांत शिंदे, संजय राठोड, गजानन होळकर, सोपान सांगळे, गुलाब जाधव, शिवाजी देमुंडे, उजगरे, गुहाडे, खिल्लारे ,जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

हे ही वाचा :

Editorial : जी-20 आणि भारतीय शेती

Fifa World Cup 2022 : मोरोक्कोची झुंज अपयशी; फ्रान्सचा अंतिम फेरीत प्रवेश

Back to top button