पिंपरी : आवक मंदावल्याने मिरची झाली तिखट | पुढारी

पिंपरी : आवक मंदावल्याने मिरची झाली तिखट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोशी उपबाजार समिती व पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये हिरवी मिरचीची आवक मंदावल्याने दरात दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. मागील आठवड्यात किरकोळ बाजारात मिरचीचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलो होते. या आठवड्यात पिंपरी मंडईत रविवारी 80 रुपये किलो दराने मिरचीची विक्री झाली. तर, घाऊक बाजारात 40 रूपये प्रतिकिलो असा दर होता.

बिटची आवकदेखील कमी झाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथून पिंपरी मंडईत बिट आले असून, घाऊक बाजारात 20 ते 25 रूपये प्रतिकिलो असा दर होता. तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये प्रति किलो दर आहेत. तर मागील आठवड्याच्या तुलनेत भेंडीची आवक जास्त आली आहे. परिणामी भेंडीचे दर कमी झाल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात 70 ते 80 रुपये किलो दराने भेंडीची विक्री झाली होती. सध्या याचे दर 40 रुपये किलो आहेत. सोलापूरची गावरान गवारदेखील मंडईत आली होती. 80 ते 100 रुपये किलो दराने गवार मिळत होती. गुजरातची भावनगरी मिरचीदेखील मंडईत आली असून 50 ते 60 रुपये दराने याची विक्री झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रतिजुडी)
कोथिंबीर 30-40
मेथी 30
शेपू 20
कांदापात 20-25
पुदिना 20
मुळा 20
चुका 30
पालक 25-30

फळभाज्या प्रतिकिलो भाव
कांदा 20-25
बटाटा 30-40
लसूण 30-40
काकडी 30-40
भेंडी 40
गवार 80
टोमॅटो 30-40
दोडका 60
हिरवी मिरची 80
दुधी भोपळा 60
लाल भोपळा 50
कारली 80
वांगी 80
भरताची वांगी 50
तोंडली 60-70
पडवळ 60
फ्लॉवर 70
कोबी 60
शेवगा 160
गाजर 50
आले 50
ढोबळी मिरची 80
घोसाळी 60
मटार गोल्डन 120
घेवडा (श्रावणी) 60

Back to top button