मोदी एक्सप्रेस १८०० प्रवाशांसह कोकण रेल्वे मार्गावर - पुढारी

मोदी एक्सप्रेस १८०० प्रवाशांसह कोकण रेल्वे मार्गावर

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

दादर ते सावंतवाडी दरम्यान कोकणवासीयांना घेऊन निघालेली मोदी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली आहे. १८०० प्रवाशांसह ही गाडी कोकणसाठी मुंबईतून सकाळी रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मोफत प्रवास असलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या गाडीचे नियोजन करण्यात आले होते. ज्यांच्याकडे गाडीत प्रवास करण्यासाठी पास होते, अशानाच प्रवेश देण्यात आला.

हेही वाचले का? 

Back to top button