नाशिक : अँटी करप्शन विभागाची सर्वात मोठी कारवाई | पुढारी

नाशिक : अँटी करप्शन विभागाची सर्वात मोठी कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभागाच्या अँटी करप्शन विभागाने शहरातील सर्वात मोठी कारवाई फत्ते करत शासकीय कर्मचारीस लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे.

सांगली : जतमध्ये विजेची तार अंगावर पडून दोन तरुणाचा मृत्यू

आदिवासी विकास येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी सुमारे 28 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विभागातील सेंट्रल किचनचे सुमारे अडीच कोटी रुपयाच्या बिल मंजुरीसाठी बिलाच्या साडेबारा टक्केवारी नुसार मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अँटी करप्शन विभागाने या प्रकरणी नजर ठेवून तब्बल 28 लाख रुपयांची स्विकारतांना बागूल यांना ताब्यात घेतले. अँटी करप्शन ब्युरो नाशिक विभाग त्यासाठी गेल्या 15 दिवसा पासून त्यांच्या मागावर होते. दिनेश बागुल यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतांना ही कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button