जळगाव : वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, चार लाख घेतले परस्पर काढून | पुढारी

जळगाव : वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, चार लाख घेतले परस्पर काढून

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
वीज कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून 3 लाख 96 हजार 609 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सायबर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी जगदीश प्रीतमदास जेठवाणी (40, वैभव कॉलनी, गणपतीनगर) बुधवारी (दसायंकाळी 4.30 ते 7 च्या दरम्यान, त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून व्हॅट्सअ‍ॅप मेसेज आला होता. त्यामध्ये वीजबिल भरण्याचे सांगण्यात आल्याचा संदेश होता. त्यानुसार जेठवाणी यांनी संपर्क साधला असता, वीज कंपनीचे अधिकारी असून वीजबिल भरण्यासाठी लिंक पाठविली. त्याद्वारे जेठवाणी यांनी संपर्क केला असता, त्यांच्या खात्यातून परस्पर 3 लाख 96 हजार 609 रुपये वळविण्यात आले. बनावट लिंकद्वारे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेठवाणी यांनी त्वरित जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.

Back to top button