सर्वाधिक केसेस असलेले नेते भाजपमध्ये : नवाब मलिक | पुढारी

सर्वाधिक केसेस असलेले नेते भाजपमध्ये : नवाब मलिक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राज्य सरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी केला हाेता.  त्याला उत्तर देताना नवाब मलिक म्‍हणाले, मोदींजी व अमित शहाजी हे ज्यापध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता त्याला मंत्री केले होते. आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचे केसेस असलेले नेते आहेत.

राजकीय सूडभावनेने कारवाई

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे, असेही नवाब मलिक म्‍हणाले.

ईडी व सीबीआय यांचा देशातील तपास ज्यापध्दतीने सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने एकप्रकारे शंका निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही एजन्सींना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. मात्र, त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं, अशी भूमिका घेतली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

ईडी व सीबीआयकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याचाच अर्थ ईडी व सीबीआय या एजन्सींच्या कारवाईवर शंका उपस्थित होते आहे.

‘… हा मोठेपणाचा विषय नाही’

देशात दरदिवशी एक कोटी लस उपलब्ध झाली पाहिजे तर महाराष्ट्रात दरदिवशी २०-२५ लाख लोक लसीच्या दुसर्‍या डोससाठी प्रतिक्षेत आहेत.

त्यामुळे देशात एका दिवसात एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला, हा मोठेपणाचा विषय नाही, असेही मलिक म्‍हणाले.

देशात एका दिवसात एक कोटी लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला.

तसाच महाराष्ट्रातदेखील एका दिवसात ११ लाख लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्य सरकारला गरजेचा आहे असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

केरळ व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यात जास्तीत- जास्त लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

हेही वाचलं का? 

पाहा : पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काढलेल्या पदयात्रेबाबत राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद

 

Back to top button