कोल्हापूर: सैनिक टाकळी येथे नदीत अडकलेल्या बहिरी ससानाला जीवदान | पुढारी

कोल्हापूर: सैनिक टाकळी येथे नदीत अडकलेल्या बहिरी ससानाला जीवदान

दत्तवाड: पुढारी वृत्तसेवा : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बहिरी ससाना अनपेक्षितपणे अडकलेला होता. त्यानंतर तो सुटकेसाठी धडपडत होता. त्याची धडपड बराच वेळ सुरू होती. दरम्यान, गवत कापण्यासाठी नदीकाठी गेलेल्या एका शेतकऱ्याने त्या पक्षाची सुटका करत जीवदान दिले.

शेतकरी जयसिंग मारुती पाटील (वय ५०) हे नदीपात्राजवळ गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना नदीपत्रात अडकलेला बहिरी ससाना तडफडत असल्याची निदर्शनास आले. मात्र, नदीपात्रात पाण्याची पातळी वाढलेली होती. शिवाय पाण्याचा प्रवाह ही वेगवान होता. तरीही मोठ्या धाडसाने त्यांनी नदीपात्रात उतरून या बहिरी ससानाला सुखरूप बाहेर काढले. व त्याला जीवनदान दिले. परिसरात त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button