पिंपरी : कोव्हिशिल्ड लसची पुन्हा टंचाई | पुढारी

पिंपरी : कोव्हिशिल्ड लसची पुन्हा टंचाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून आठ केंद्रांवर देण्यात येणार्‍या कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसची पुन्हा टंचाई जाणवत आहे. शुक्रवारी ही लस उपलब्ध होणार नाही. कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स ही लस मात्र उपलब्ध असणार आहे. शहरात 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान कोव्हिशिल्ड लस उपलब्ध नव्हती. 4 तारखेला ही लस प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली.

मात्र आता 5 तारखेला पुन्हा ही लस उपलब्ध होणार नसल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाकडून कळविण्यात आले आहे. राज्य सरकारकडून सध्या कोव्हिशिल्ड लसचा अपुरा पुरवठा होत आहे. कोव्हिशिल्ड लस घेणार्‍या नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे ही लस केंद्रांवर उपलब्ध करणे खूप गरजेचे आहे. मात्र ही लस मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कोव्हॅक्सिन आणि 12 ते 14 वयोगटातील मुलांना देण्यात येणारी कोर्बेव्हॅक्स प्रत्येक केंद्रावर 200 याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Back to top button