सोलापूर : हजार कोटींच्या ठेवी; लोकमंगल पतसंस्था राज्यात तिसरी | पुढारी

सोलापूर : हजार कोटींच्या ठेवी; लोकमंगल पतसंस्था राज्यात तिसरी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सभासदांच्या विश्वासामुळेच लोकमंगल पतसंस्थेने 1000 कोटी रुपयांच्या ठेवींची पूर्तता केली आहे. अशाप्रकारची कामगिरी करणारी लोकमंगल पतसंस्था ही राज्यात तिसरी असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
रविवारी (ता. 31) लोकमंगल पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सोलापूर येथे झाली, त्यावेळी आमदार देशमुख यांनी माहिती दिली.

यावेळी संस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, व्हाईस चेअरमन निर्मला कुंभार, तज्ज्ञ संचालक मनीष देशमुख, हरिश्चंद्र गवळी, संचालक फैय्याज अहमद सरदार मुलाणी, युवराज गायकवाड, रेवणप्पा व्हनमाने, समाधान पाटील, सिद्राम देवकुळे, भीमाशंकर कलशेट्टी, संचालिका सरोजनी टिपे, सरव्यवस्थापिका अलका देवडकर, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. धनंजय केकडे उपस्थित होते.

आमदार देशमुख म्हणाले, संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचार्‍यांची कामावरची निष्ठा व आपण सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी दाखविलेला विश्वास व सर्व कर्जदारांनी नियमित केलेली कर्ज परतफेड यामुळेच पतसंस्थेने आजअखेर 1000 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला. तेली यांनी सभेचे प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापिका अलका देवडकर यांनी अहवालवाचन केले. 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामकाज करणार्‍या शाखांना पुरस्कार दिले. त्यामध्ये पंढरपूर शाखा नं.1, तेरा मैल, करकंब व श्रीपूर या शाखांचा समावेश होता. युवराज गायकवाड यांनी आभार मानले.

सभासदांना 12 टक्के लाभांश

यावेळी संचालक मंडळाने 12 टक्के लाभांश देण्याची शिफारस केली. सभासदांनी यासह सर्व विषयांना एकमताने मान्यता दिली.

Back to top button