सोलापूर : होम मिनिस्टर स्पर्धेत 200 महिलांचा सहभाग | पुढारी

सोलापूर : होम मिनिस्टर स्पर्धेत 200 महिलांचा सहभाग

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जे. जे. प्रतिष्ठानच्या वतीने स्वकुळ साळी समाजातील महिलांकरिता पहिल्यांदाच घेतलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. दोनशे महिलांनी सहभाग घेतला. सुनीता जिंदे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्षा शांताताई केंदुळे होत्या. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चिल्लाळ यांनी संस्थेच्या 15 वर्षांच्या वाटचालीचा प्रवास मांडला. ज्ञाती संस्थेचे सचिव जयहरी साखरे, जगन्नाथ ढगे, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रविण कापसे यांच्या हस्ते भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सूत्रसंचालन उमा जिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी भाऊजी म्हणून संदीप सरवदे यांनी योगदान दिले. स्पर्धकांना जगन्नाथ ढगे, अनिकेत सरवदे यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आले. या स्पर्धेमध्ये लिंबू चमचा, बटाटा रेस, पाणी पुरी खाणे, कपाळावर टिकली लावणे व चमचेने बॉल टोपलीत टाकणे या वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करून विजेत्या स्पर्धकांना पुढील फेरीत प्रवेश दिला गेला. अत्यंत उत्कंठावर्धक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत सुनीता अनिल जिंदे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी जिंकली. तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सोन्याची नथ श्रद्धा राऊत यांनी जिंकली. वर्षा ढगे यांनी तृतीय क्रमांकाचे चांदीचा छल्ला जिंकला. सुधा हेमाडे, रत्नप्रभा चिल्लाळ, सरोजा गदगे, सोनल एकबोटे, अनुराधा काजळे यांनी परीक्षकाचे काम पाहिले.

उपांत्य फेरीतील सर्व स्पर्धकांना विशेष भेटवस्तू व तिन्ही विजेत्यांना पारितोषिकांचे दिमाखदार पद्धतीने वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेसाठी अध्यक्ष गिरीश गुळेद, उपाध्यक्ष नरेंद्र याळगी, सचिव मधुकर चिल्लाळ, खजिनदार अविनाश गदगे, डॉ. मल्लेश्वर येडके, संतोष चिल्लाळ, अ‍ॅड. धनंजय वांझरे, मनोज चिल्लाळ, महेश गुळेद, कुमार गुळेद, विनायक टोणपे, चंद्रकांत धोत्रे, संजय माळवदकर, चंद्रकांत गुळेद, महेश चिल्लाळ, अनिल कोबन, विशाल एकबोटे, संतोष भंडारे, वृषांक एकबोटे, कृष्णा येडके, बालकिसन साखरे, बालाजी गणपा, अरुण कपुरे, अनिल गदगे व अजय ढगे यांनी परिश्रम घेतले.

Back to top button