मुख्यमंत्र्यांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान : नवाब मलिक | पुढारी

मुख्यमंत्र्यांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान : नवाब मलिक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असेही नवाब मलिक यांनी स्‍पष्‍ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याच पध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

नारायण राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ : मोहरम निमित्त बाबुजमाल दर्ग्यातील खत्तलरात्र

 

Back to top button