पिंपरी : टेम्पोचे भाडे मागणार्‍या मायलेकींना मारहाण | पुढारी

पिंपरी : टेम्पोचे भाडे मागणार्‍या मायलेकींना मारहाण

पिंपरी : टेम्पोच्या भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मायलेकींना दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना 30 जून रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास बोराडेवाडी, मोशी येथे घडली. बिपीनकुमार श्रीयशपाल सिंह (वय 25), हिमांशुकुमार श्रीयशपाल सिंह (19, दोघे रा. बोराडेवाडी, मोशी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी जखमी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 4) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची आई आरोपी बिपीनकुमार यांच्याकडे टेम्पो भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेल्या. दरम्यान, टेम्पो भाड्याच्या हिशोबावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपी हिमांशुकुमार याने कसल्यातरी हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच, फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करीत मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.

Back to top button