नगर : बनावट पॉलिसीच्या नावाने फसवणूक | पुढारी

नगर : बनावट पॉलिसीच्या नावाने फसवणूक

नगर : पुढारी वृत्तसेवा : बनावट इन्श्युरन्स पॉलिसी देऊन 110 ग्राहकांना सहा लाख 15 हजार 684 रूपयांनी गंडविणार्‍या महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

अटकेतील महिलेला न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सिमरण नंदकुमार पाटोळे (26, मुळ रा. बडगाव गुप्ता, ता. नगर, हल्ली रा. चेतना कॉलनी, नागापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. वासन ब्रदर्स प्रा.लि. केडगाव येथे सिमरण पाटोळे हिने वाहनाचा इन्श्युरन्स उतरविण्यासाठी 110 ग्राहकांकडून जास्त रक्कम घेऊन प्रत्यक्षात शोरूममध्ये कमी रकमेचा भरणा केला होता.

या प्रकरणात सहा लाख 15 हजार 684 रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अनिश सुभाष आहुजा (रा. तारकपूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सिमरण पाटोळे ही महिला पसार होती.

Back to top button