नगर : महसूल सहायक लाचेच्या जाळ्यात | पुढारी

नगर : महसूल सहायक लाचेच्या जाळ्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयातील भूंसपादन विभागतील महसूल सहायकाला चार हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. जमिनीच्या अकृषक परवानगीसाठी लागणार्‍या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी चार हजारांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

भूसंपादन कार्यालयातील मंगेश ढुमणे (वय 41, रा. गणेश चौक, सिव्हिल हडको, नगर) असे पकडण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 4) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात सापळा लावून या कर्मचार्‍याला पकडले. तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीचा अकृषक परवाना मिळविण्यासाठी लागणार्‍या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज दिला होता. तो देण्यासाठी महसूल सहायक ढुमणे याने तीन हजारांची मागणी दि. 1 जुलै 2022 रोजी केली होती.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी सापळा लावून चार हजारांची लाच घेताना महसूल सहायक मंगेश ढुमणे याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, गहिनीनाथ गमे, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, हरून शेख, राहुल डोळसे आदींच्या पथकाने केली.

Back to top button