‘डॉक्टर डे’निमित्त जिल्हा परिषदेत डॉक्टरांचा सन्मान | पुढारी

‘डॉक्टर डे’निमित्त जिल्हा परिषदेत डॉक्टरांचा सन्मान

सोलापूर : पुढारी वृत्तसेवाजि. प. सीईओ दिलीप स्वामी यांच्या पुढाकारने जिल्हा परिषद सेवेतील वैद्यकीय अधिकारी व प्रशासनातील डॉक्टर्स यांच्या कार्याचे कौतुक डॉक्टर डे च्या निमित्‍ताने करण्यात आला. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यावेळी उपस्थित डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आरोग्य देवता धन्वंतरी मूर्तीचे पूजन व स्तवन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी ईशाधीन शेळकंदे, अतिरीक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. अमित पाटील, डॉ. इरफान सय्यद आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात 3 रा क्रमांकावर आल्याने सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना यावेळी सीईओ स्वामी यांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उत्कृष्ट कामकाजाबद्दल डॉ. बाबासाहेब गाढवे, डॉ. प्रतिभा गायकवाड, डॉ. डी. जी. शिंदे या वैद्यकीय अधिकार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दक्षिण सोलापूर व उत्‍तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुर्वेद दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारनी आणि समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सोनिया बागडे, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. मोहन शेगर आदी डॉक्टरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. विलास सरवदे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ .अमित पाटील यांनी मानले.

Back to top button