नगर : लोणीत सोयाबीन उत्पादनावर प्रशिक्षण | पुढारी

नगर : लोणीत सोयाबीन उत्पादनावर प्रशिक्षण

लोणी : पुढारी वृत्तसेवा : कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि आत्मा अहमदनगर यांच्या संयुक्त नियमाने लोणी बुद्रूक येथे ‘ऊस पिकामधील हुमणी अळी नियंत्रण आणि सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयांवर प्रशिक्षण झाले. कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षणविषयाचे शास्त्रज्ञ भरत दंवगे यांनी ऊस पिकातील हुमणी अळीचे नियंत्रण करताना शेतकर्‍यांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे सुचविले.

नगर : इनोव्हा-दुचाकीची धडक : दोघे गंभीर जखमी

पाऊस पडल्याबरोबर शेतकर्‍यांनी प्रकाश सापळे लावून हुमणीचे भुंगेरे गोळा करून नष्ट करावे. शेतामध्ये लगेच मेटारायझियम निसोप्ली हे जैविक कीटकनाशक वापरण्याचे आवाहन करून गरजेनुसार पिकांमध्ये दाणेदार फिप्रोनिल किंवा ठिंबकद्वारे 50 टक्के क्लोरोपायरीफॉसचा वापर करावा, असा सल्लाही दवंगे यांनी शेतकर्‍यांना दिला.

नगर : घारगाव परिसरात मुसळधार पाऊस

कृषी विभागाचे निवृत्ती मंडल कृषी अधिकारी नारायण लोळगे यांनी शेतकर्‍यांना सोयाबीन उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. बीजप्रक्रिया, सोयाबीन खत व्यवस्थापन, सोयाबीन उगवण चाचणी, पीक संरक्षण आदी विषयांवर शेतकर्‍यांना माहिती दिली
यावेळी डॉ. प्रमोद म्हस्के, प्रवीण म्हस्के, लक्ष्मणराव विखे, गणेश विखे, एल. एम. विखे, राजेंद्र म्हस्के, रवि राठी, बाळासाहेब विखे, अण्णा पाटील विखे यांच्या बरोबरच ऊस आणि सोयाबीन उत्पादक आणि कृषी विभागाचे किशोर कडू, नितीन शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते. या सर्वांनी प्रशिक्षाणाचा लाभ झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Back to top button