सांगोला तालुक्यात गौरी ढोले 98.20 टक्के गुणांसह प्रथम | पुढारी

सांगोला तालुक्यात गौरी ढोले 98.20 टक्के गुणांसह प्रथम

सांगोला : पुढारी वृत्तसेवा मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी प्रशालेचा निकाल 96 टक्के लागला असून 58 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून सुयश प्राप्त केले.गौरी ढोले या विद्यार्थिनीने 98.20 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

दहावीमध्ये विशेष श्रेणीमध्ये 179, प्रथम श्रेणीमध्ये 175, द्वितीय श्रेणीमध्ये138, तर उत्तीर्ण श्रेणी 44 विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तसेच प्रशालेमध्ये ढोले गौरी दत्तात्रय 98.20 टक्के प्रथम क्रमांक, इंगवले यशश्री अनिल 98.00 टक्के, पाटील मैथिली ऋषिकेश 98.00 टक्के, दिघे तनुजा सर्जेराव 98.00 टक्के द्वितीय क्रमांक, सावंत श्रुती हरिश्चंद्र – 97.40 टक्के, घुणे विजय शंकर- 97.40 टक्के तृतीय क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म. शं. घोंगडे, सचिव म. शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीषण माने, अजय बारबोले, पोपट केदार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Back to top button