माळशिरस येथे दीड लाखाची घरफोडी | पुढारी

माळशिरस येथे दीड लाखाची घरफोडी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा माळशिरस येथील पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या माने बिल्डिंगमधील बंद घर फोडून चोरट्याने 1 लाख 47 हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. याबाबत सिध्दार्थ तुकाराम मोहिते (वय 19, रा. माळशिरस) याने दिलेल्या फिर्यादीवरून माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे ते 12 जून या कालावधीत मोहिते यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने बेडरूममधील लाकडी कपाटाच्या ड्रॉव्हरमधील दोन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, रोख 7 हजार रूपये, असा ऐवज चोरून नेला. याबाबत माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक शेळके पुढील तपास करीत आहेत.

Back to top button