बार्शी, उत्तर तालुक्यातील 11 जण तडीपार | पुढारी

बार्शी, उत्तर तालुक्यातील 11 जण तडीपार

सेालापूर : पुढारी वृत्तसेवा बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 11 गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्यांना तडीपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिले आहेत. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह विविध निवडणुकांच्या द़ृष्टीने हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यांतील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. बार्शी तालुका तसा राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये, तसेच समाजात शांतता पान 2 वर

सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून निकम यांनी बार्शी आणि उत्तर सोलापूर पोलिस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावाची शहानिशा केली. यानुसार तब्बल 11 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. यामध्ये काहींना वर्ष, सहा महिने तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.

यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथील शंकर विष्णु ढगे याला 5 फेबु्रवारी 2020 पासून सहा महिन्यासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मार्डी तालुका उत्तर सेालापूर येथील प्रवीण ऊर्फ चिंच्या प्रकाश गोडसे याला 25 फेब्रवारी 2020 पासून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.

वैराग (ता. बार्शी) येथील सैफन गालिब शेख याला 17 सप्टेबर 2020 पासून सहा महिन्यासाठी तडीपार केले आहे. वैराग येथील बंडू ऊर्फ अनिल आबा ऊर्फ अभिमान सातपुते, मनोज वाघमारे सिध्दार्थ नगर वैराग याला ही सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. प्रमोद ऊर्फ सीताराम ऊर्फ मुन्ना महादेव जाधव (रा.सारोळे, ता. बार्शी) याला 14 ऑक्टोबर 2020 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते.

रस्तापूर (ता. बार्शी) येथील अविनाश ढाकर्‍या भोसले याला सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. बार्शी शहरातील गिरीष ताटे आणि कोरफळे ता बार्शी येथील राहुल भारत काळे याला 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. प्रमोद ऊर्फ पिंट्या गणपत ढेंगळे (रा.ज्योतीबाचीवाडी, ता. बार्शी) याला 11 मार्च 2022 पासून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. कुंडलिक बंलटु मेरड याला 7 जुन 2022 पासून तीन महिन्यासाठी तडीपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिले आहेत.

गेल्या दीड ते दोन वर्षात जवळपास 20 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी काही लोकांचा कालावधी संपलेलाही आहे.तर दुसरीकडे आणखी काही प्रस्ताव आले आहेत. त्यावर ही लवकरच कारवाई करण्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.

Back to top button