सिंहगड पायथ्याला अपघात; एका तरुणाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी | पुढारी

सिंहगड पायथ्याला अपघात; एका तरुणाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

किरकटवाडी : वृत्तसेवा

चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे पानशेत रस्त्यावर गोऱ्हे खुर्द (तालुका हवेली ) गावाच्या हद्दीत कार पुलावरून कोसळून झाडाला धडकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे तरूण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी आठच्या सुमारास पानशेत कडून पुण्याकडे येताना हा अपघात झाला.

युपीएससी परीक्षेत राज्‍यात प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम 

नितीन घाणेकर (वय 22, रा. राजेंद्र नगर, नवी पेठ, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून शंतनू वडनेरकर ( वय 22)  व शुभम ढेबे (वय 24) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सकाळी साडेसात च्या सुमारास हे तिघे तरुण मारुती वॅगनार कारने पानशेत कडून पुण्याच्या दिशेने येत होते खानापूर पासून पुढे गोऱ्हे  खुर्द गावाच्या हद्दीत आल्यानंतर हॉटेल रविराज च्या समोर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून खाली कोसळून शेतात असलेल्या झाडावर आदळली.

भाजपनं संभाजीराजेंची ढाल करुन स्वतःचा उमेदवार उतरवला, संजय राऊतांचा आरोप

अपघाताचा आवाज ऐकून  स्थानिक नागरिक मदतीसाठी नवले. त्यांनी जखमी तरुणांना बाहेर काढले आणि  पोलीस प्रशासनाला अपघाताची  माहिती दिली. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधू पुढील कार्यवाही करत आहेत.

हेही वाचा

नाशिक : शेतकऱ्याची बिबट्याशी झुंज ; बिबट्याच्या जबड्यातून केली स्वतःची सुटका

नाशिक : धावत्या रेल्वेखाली उडी घेत मायलेकींची आत्महत्या

PM CARES for Children Scheme : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दर महिन्याला ४ हजार रुपये, ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

Back to top button