बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून पालिका केव्हा वसूल करणार ४० लाख रुपये? | पुढारी

बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून पालिका केव्हा वसूल करणार ४० लाख रुपये?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नगरसेवक पद निर्रह ठरल्यानंतर १२ नगरसेवकांकडून वेतन व भत्ता पायी अदा केले होते. ३९ लाख ९५ हजार ८३३ रुपये वसूल करण्यासाठी पत्रव्यवहार केली आहे. अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महापालिका चिटणीस खात्याने दिली आहे. यात भाजपचे ३, शिवसेनेचे ३, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे १ आणि अपक्ष २ नगरसेवक आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती. ज्या नगरसेवकांचे पद निर्रह झाले. त्यांच्याकडून वेतन व भत्ता पायी अदा केलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे.

माहिती अधिकार अंतर्गत दिलेली माहितीत चिटणीस खात्याने माहिती दिली. त्यात २४ नगरसेवकांची यादी दिली. ज्यांचे पद विविध कारणांसाठी निर्रह झाले आहेत. यात १२ नगरसेवकांनी ३९ लाख ९५ हजार ८३३ रुपये अदा केले नाहीत.

तर ९ नगरसेवकांनी तत्काळ रक्कम अदा केली आहे. ३ असे नगरसेवक आहेत जे ज्यांस निर्रह ठरल्यानंतर कोणतीही रक्कम अदा करण्यात आली नाही.

थकबाकी न देण्यामध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येक ३ नगरसेवक आघाडीवर आहेत. यात भाजपचे मुरजी पटेल ५.६४ लाख रुपये, केशरबेन पटेल ५.६४ लाख रुपये आणि भावना जोबनपुत्रा ३.४९ लाख रुपये अदा करत नाहीत.

काँग्रेसचे राजपती यादव ५.६४ लाख रुपये, किणी मॉरेश ४.८४ लाख रुपये आणि भारती धोंगडे १.८१ लाख रुपये अदा करण्यास तयार नाही. शिवसेनेचे सगुण नाईक ३.५५ लाख रुपये, अनुषा कोडम ३७ हजार आणि सुनील चव्हाण ९३ हजार रुपये अदा करत नाहीत.

ष्ट्रवादी काँग्रेसच्या नाजीया सोफी ७.२१ लाख रुपये अदा करत नाहीत. अपक्ष असलेलं चंगेझ मुलतानी ७९ हजार रुपये आणि अंजुम असलम ४५ हजार रुपये अदा करत नाहीत.

जे नगरसेवक रक्कम अदा करत नाहीत त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पैसे वसूल होतील. अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केली आहे.

Back to top button