सोलापूर : बाप-लेकाकडून बांधकाम व्यावसायिकाची २९ लाखांची फसवणूक | पुढारी

सोलापूर : बाप-लेकाकडून बांधकाम व्यावसायिकाची २९ लाखांची फसवणूक

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : बाप-लेकाने मिळून एका बांधकाम व्यवसायिकाची २९ लाख ८३ हजार ८७७ रुपये इतकी रक्कम घेऊन परत न देता फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी सुरेंद्र चक्रपाणी चिलका (वय-५४,रा.फ्लॅट नंबर ५,चौथा मजला, लीला आर्केड, रेल्वे लाइन्स,सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून राहुल राजकुमार रेड्डी आणि राजकुमार रेड्डी (दोघे रा.साई कॉम्प्लेक्स,पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा चुलत भाऊ प्रशांत चिल्का यांचा मित्र राहुल रेड्डी यांची व फिर्यादी यांची बांधकाम व्यवसायामुळे मागील दहा वर्षांपासून ओळख होती. वरील संशयीत आरोपी यांनी एच. एस. आर साईट धुळे सोलापूर या पाण्याच्या टाकीचे काम इंडियन ह्यूमन पाईप कंपनी लिमिटेड यांच्याकडून घेऊन त्यात फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यावेळी फिर्यादी सुरेंद्र चिलका यांच्याकडून वेळोवेळी चेक व रोख रक्कम असे एकूण २९ लाख ८३ हजार ७७७ रुपये इतकी रक्कम आशिष चिलका व प्रमोद पुकाळे यांच्या समक्ष फिर्यादीच्या राहत्या घरातून घेऊन गेले.

त्यानंतर फिर्यादीकडून घेतलेले रक्कम फिर्यादी यांना परत न करता सोलापूर जनता सहकारी बँक लि. येथील बँकेतील खाते बंद असलेल्या खात्यावरील खोटे चेक देऊन फिर्यादीस मानसिक त्रास देऊन विश्वासघात केला आणि आर्थिक फसवणूक केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई गायकवाड हे करीत आहेत.

Back to top button