पिंपरी : दहा लाखांच्या चपला चोरीला | पुढारी

पिंपरी : दहा लाखांच्या चपला चोरीला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भाऊ आणि भावाच्या बायकोने फ्लॅटमध्ये ठेवलेल्या 10 लाख 27 हजार रुपयांच्या चपला चोरून नेल्या. ही घटना 12 मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपरी येथे उघडकीस आली.

तर ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो, नितेश राणेंचा गंभीर इशारा

याप्रकरणी रवींद्र यादवराव करांडे (56, रा. पिंपळे सौदागर) यांनी बुधवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विष्णू यादव करांडे (वय 60) आणि त्यांची पत्नी (55, दोघे रा. पीडब्ल्यूडी पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ नंतर पुन्हा दिसणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा, नवा चित्रपट प्रदर्शनास सज्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एका फ्लॅटमध्ये 10 लाख 27 हजार 742 रुपयांच्या चपला व बुट साठवून ठेवल्या होत्या. दरम्यान, फिर्यादी यांचा भाऊ आरोपी विष्णू आणि त्यांच्या पत्नीने चपला व बुट चोरून नेले, असे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button