भुसावळ : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच जणांवर गुन्‍हा दाखल - पुढारी

भुसावळ : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच जणांवर गुन्‍हा दाखल

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिप वायरल केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यातील चार आरोपी अल्पवयीन असून, एका आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

२०१८ ते १२ जुलै २०२१ दरम्यान भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी परिसरातील बंद रेल्वे क्वार्टरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी, एका मुलाने रूमच्या मागील दरवाजाची कडी बाहेरून बंद केली.

त्यानंतर सुबोध यशोदेसह इतर तिघांनी अल्पवयीन मुलांनी जबरदस्तीने सामूहिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ तयार केला.

हा व्हिडिओ आरोपींनी व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सुबोध सुरेश यशोदे (वय २०) यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यशोदे यास पोलिसांनी अटक केली आहे. इतर अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात रवानगी केली जाणार आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी यांनी या परिसरात जाऊन बंद रेल्वे क्वार्टरची पाहणी केली. त्यांनी घटनाक्रम जाणून घेतला.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक विनोद कुमार गोसावी तपास करीत आहेत.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट

Back to top button