सोलापूर : शेलगाव(क) येथे शेतकर्‍याचा खून | पुढारी

सोलापूर : शेलगाव(क) येथे शेतकर्‍याचा खून

करमाळा ; पुढारी वृत्तसेवा : शेलगाव (क) (ता. करमाळा) येथे भरत सोमनाथ माने (वय 57) यांचा अज्ञाताने शेतात केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. बुधवारी (दि. 19) सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय आहे. याबाबत करमाळा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू होती.

भरत माने हे कुटुंबीयांसमवेत शेलगावात राहतात. गावापासून काही अंतरावर त्यांची शेती आहे. शेती करण्यासाठी ते एकटेच शेतात राहत होते. नेहमीप्रमाणे ते रात्री वस्तीवर झोपले होते. त्यावेळी त्यांना अज्ञाताने मारहाण केली. त्यामुळे ते बेशुद्धावस्थेत पडले होते.

सकाळी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीय व शेजारी त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी ते रक्‍तबंबाळ व बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

Back to top button