Wipro sacks freshers | विप्रोतून ८०० फ्रेशर्सना घरचा रस्ता; अंतर्गत मूल्यमापनात झाले ‘फेल’ | पुढारी

Wipro sacks freshers | विप्रोतून ८०० फ्रेशर्सना घरचा रस्ता; अंतर्गत मूल्यमापनात झाले 'फेल'

पुढारी ऑनलाईन : अंतर्गती चाचणीत नापास झालेल्या ८०० कर्मचाऱ्यांना विप्रोने घरचा रस्ता दाखवला आहे. हे सर्व कर्मचारी फ्रेशर्स आहेत. विप्रोने या बातमीला दुजोरा दिला असला तरी कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जाहीर केलेली नाही.

बिझनेस टुडे या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. एक कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर ७५ हजार रुपये खर्च केले जातात, पण ही रक्कम या कर्मचाऱ्यांकडून वसुल केली जाणार नाही, असे विप्रोने म्हटले आहे.

कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “माझे ऑफर लेटर जानेवारी २०२२चे आहे. पण माझी नेमणूक फार उशिरा झाली. आता अंतर्गत चाचणीचे कारण दाखवून कामावरून कमी केले आहे,” अशी प्रतिक्रिया एक कर्मचाऱ्याने दिली आहे.

विप्रोने म्हटले आहे की, “एंट्री लेव्हलच्या प्रत्येक कर्मचाऱ्यात कामबद्दल काही गती असणे आवश्यक असते. आम्ही कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करतो. ही प्रक्रिया परिपूर्ण आहे. त्यानंतर आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. काही वेळा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागते.”

हेही वाचा

Back to top button