Truecaller वर मिळणार सरकारी कार्यालये अन् अधिकाऱ्यांचे नंबर; जाणून घ्या काय आहे नवे फिचर | पुढारी

Truecaller वर मिळणार सरकारी कार्यालये अन् अधिकाऱ्यांचे नंबर; जाणून घ्या काय आहे नवे फिचर

पुढारी ऑनलाईन : Truecaller हे फोन नंबर ओळखणारे अ‍ॅप म्हणून ओळखले जाते. Truecaller वर अनेक फिचर्स आहेत. यामध्ये नवीन एक फिचर अ‍ॅप झाले आहे. ज्याच्या साहाय्याने truecaller वर आपपल्या सरकारी कार्यालयांचे नंबर आणि संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर मिळवता येणार आहे. या नव्याने येऊ घातलेल्या फिचरमुळे नागरिक आणि सरकारी यंत्रणा यामधील परस्पर संवाद सहज आणि सोपा होणार आहे. या फिचरचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्या पार कराव्या लागणार आहेत. यावर तुम्हाला खात्रीशीर नंबर मिळवता येणार आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे हे नवीन फिचर.

भारतीय लोक Truecaller हे अ‍ॅप मोठ्या संख्येने वापरतात. हे एक कॉलर आयडेंटिफिकेशन अ‍ॅप आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता अनेक सुविधा मिळतात. अ‍ॅप एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे, ज्याद्वारे तुम्हाला सरकारी फोन डायरेक्ट जोडला जाऊ शकतो. यामुळे नागरिक आणि सरकारी कार्यालयांध्ये संपर्क आणि संवाद वाढणार आहे.

या डायरेक्टरीमध्ये अ‍ॅप यूजर्संना हजारो व्हेरिफाइड सरकारी अधिकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपमधील यादीत तुम्हाला हेल्पलाईन नंबर, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था, शिक्षण संस्था, रुग्णालये आणि इतर महत्त्वाचे क्रमांक मिळणार आहेत. तसेच Truecaller वर २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी एजेंन्सीच्या डिटेसल्स उपलब्ध होणार आहेत.

कंपनीने दिलेल्या या नवीन अ‍ॅपमधील सुविधेमुळे डिजिटल गव्हर्नमेंटच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे फसवणूक, घोटाळा रोखण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच यामुळे डिजिटल कम्युनिकेशनला देखील उभारी मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button