नेटवर्क जॅमर किंवा बुस्टर वापरत असाल, तर ही बातमी आहे तुमच्याचसाठी ! | पुढारी

नेटवर्क जॅमर किंवा बुस्टर वापरत असाल, तर ही बातमी आहे तुमच्याचसाठी !

तुमच्याकडे नेटवर्क जॅमर किंवा बुस्टरचा वापर होत असेल तर आमच्याकडे या संदर्भात खास बातमी आहे. भारत सरकारने जॅमर, बुस्टर किंवा रिपीटर्सच्या वैयक्तिक वापरावर बंदी आणली आहे. दूरसंचार विभाग आणि संचार मंत्रालयाने 1 जुलै 2022 ला जॅमर, बुस्टर किंवा रिपीटर्सच्या वैयक्तिक वापरासंदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत.

यात लिहिलं आहे की भारत सरकारच्या परवानगीशिवाय केलेला जॅमर, जीपीएस ब्लॉकर किंवा इतर सिग्नल जॅमिंग डिव्हाईसचा वापर अवैध समजला जाईल. याशिवाय वैयक्तिक खरेदी-विक्रीवरही निर्बंध घातले जातील. या शिवाय या उपकरणाच्या ऑनलाईन खरेदी-विक्री किंवा जाहिरातीवरही निर्बंध असतील. केवळ लायसन्सप्राप्त दूरसंचार सर्व्हिस प्रोव्हायडरच हे डिव्हाईस वापरू शकतात.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) सरकारच्या या निर्णयाच स्वागत केलं आहे. ते म्हणतात, ‘आम्ही दूरसंचार विभागाने केलेल्या सुचनाचं स्वागत करतो. वायरलेस टेलीग्राफी अॅक्ट, 1933 आणि इंडिया टेलीग्राफ अॅक्ट, 1885 नुसार जॅमर, जीपीएस ब्लॉकर किंवा इतर सिग्नल जॅमिंग डिव्हाईसचा वापर, खरेदी- विक्री हा एक अवैध आणि शिक्षेस पात्र असा प्रकार आहे. हे डिव्हाईस दूरसंचार सेवेवर प्रतिकूल परिणाम करतात. या सूचनेमुळे निर्दोष नेटवर्क सेवा देणं शक्य होणार आहे.’

संबंधित बातम्या

 

Back to top button