फेसबुक अकाऊंट डिलिट कसे कराल? FB वरील तुमची माहिती सेव्ह कशी कराल? | पुढारी

फेसबुक अकाऊंट डिलिट कसे कराल? FB वरील तुमची माहिती सेव्ह कशी कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क

फेसबुक हे जगातील सर्वांत मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकवर असल्याचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटेही आहेत. फेसबुकचा कंटाळ येऊन जर तुम्ही फेसबुक अकाऊंट डिलिट करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
फेसबुक आर्काइव्हमध्ये फोटो, ॲक्टिव्ह सेशन्स, चॅट हिस्ट्री, IP, क्लिक केलेल्या जाहिराती अशा कितीतरी प्रकारची माहिती सेव्ह झालेली असते. अकाऊंट डिलिट करण्यापूर्वी ही माहिती डाऊनलोड कशी करायची ही माहिती आपण आधी घेऊ.

१)  आधी सेटिंग्ज आणि प्रायव्हसीमधून सेटिंग्जवर जा.

२) या ठिकाणी डाव्या बाजूला Your Facebook Information असे बटण असेल.

३) यावर मध्यभागी Downloan Your Private Information असे बटण आहे.

४) तेथून तुम्ही डाऊनलोड पेजवर जाल. येथून तुम्हाला जी माहिती डाऊनलोड करायची आहे, ती सिलेक्ट करा किंवा सिलेक्ट ऑल करा. ही माहिती एकतर HTML किंवा JSON मध्ये डाऊनलोड होईल. तुम्हाला हवा तो पर्याय निवडा

५) त्यानंतर Request Download असे बटण येईल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची डाऊनलोड करण्यासाठीची फाईल तयार आहे हे सांगणारा इमेल येईल. हा इमेल आल्यानंतर डाऊनलोड पेजवर जा. तेथे Availabel Pages असे बटण असेल. त्यावर क्लिक करून फाईल डाऊनलोड करा.

अकाऊंट डिलिट कसे करावे?

Your Facebook Information या पेजवर गेल्यानंतर Deactivation and Deletion असा पर्याय असेल. त्यातून तुम्हाला हवा तो पर्याय निवडा; पण एकदा अकाऊंट डिलिट केले तर तेच अकाऊंट पुन्हा वापरता येत नाही, हे लक्षात ठेवा.

हेही वाचा : 

Back to top button