शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव

शुक्रवारी पुण्यात समारंभ
Shiv Chhatrapati Sports Awards
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव, तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी (सांगली), जागतिक विजेते तिरंदाज आदिती स्वामी (सातारा), ओजस देवतळे (नागपूर), क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे (मुंबई), ऋतुराज गायकवाड (पुणे) यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरविले जाणार आहे. एकूण 89 पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

पुण्यात शुक्रवार 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सन 2022-23 व 2023-24 अशा दोन वर्षांच्या पुरस्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे. मुंबईत मंगळवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे एकूण 89 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 18 खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जीवन गौरवसाठी 5 लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी 3 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news