

इंदूर; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाची लेग स्पिनर अॅलाना किंगने अवघ्या 18 धावांत 7 बळी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने (women's world cup) दक्षिण आफ्रिकेचा अक्षरशः धुव्वा उडवला. आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 97 धावांत संपुष्टात आणला आणि 16.5 षटकांत 3 बाद 98 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला.
ऑस्ट्रेलियाची हंगामी कर्णधार ताहलिया मॅकग्राने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, किंगच्या भेदक मार्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. यादरम्यान, अॅलाना महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 7 बळी घेणारी पहिलीच गोलंदाज ठरली. तिने 43 वर्षे जुना विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या जॅकलिन लॉर्ड यांच्या नावावर होता. जॅकलिनने 1982 मध्ये भारताविरुद्ध 10 धावांत 6 बळी घेतले होते.
संक्षिप्त धावफलक (women's world cup)
दक्षिण आफ्रिका : 24 षटकांत सर्वबाद 97. (लॉरा 31. अॅलाना किंग 7 षटकांत 18 धावांत 7 बळी).
ऑस्ट्रेलिया : 16.5 षटकांत 3 बाद 98. (बेथ मुनी 42, जॉर्जिया 38).