Paris Paralympics: भारतीय नेमबाजांचा धमाका! गोल्ड-ब्रांझपदक जिंकून रचला इतिहास

अवनी लेखराचा ‘सुवर्ण’ वेध, मोना अग्रवालची ‘कांस्य’ कामगिरी
Paris Paralympics India
भारतीय पॅरालिम्पियन नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस पॅराल्म्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. तर याच स्पर्धेत नेमबाज मोना अग्रवालने कांस्यपदक पटकावले.Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय पॅरालिम्पियन नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhara wins gold medal) हिने शुक्रवारी (30 ऑगस्ट) इतिहास रचला. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच-1 स्पर्धेत पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने कांस्यपदक (Mona Agarwal wins bronze medal) पटकावले. या दोन पदकांसह सध्या सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे खाते उघडले आहे.

ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू

22 वर्षीय अवनीने अंतिम फेरीत 249.7 गुण मिळवले. हा पॅरालिम्पिक विक्रम आहे. कांस्यपदक विजेत्या मोनाने 228.7 गुण मिळवले. अवनीने टोकियो पॅरालिम्पिक (2020) मध्येही याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याच स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या ली युनरीने रौप्यपदक पटकावले. अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्येही कांस्यपदक जिंकले होते. पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी अवनी ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅक टू बॅक गोल्ड मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय ऍथलीट ठरली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news