Deepthi Jeevanji : 'माकड' म्हणून गावकरी चिडवायचे, आईने सांगितली दीप्तीची वेदनादायक गोष्ट

पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी, सर्वांच्या टिकेला दिले उत्तर
Deepthi Jeevanji
आज संपूर्ण जग दीप्ती जीवनजीला सलाम करत आहे. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकपूर्वी तिचा प्रवास सोपा नव्हता.Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज संपूर्ण जग दीप्ती जीवनजीला सलाम करत आहेत. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकपूर्वी तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला गावातील नातेवाईकांचे प्रेम आणि पाठबळ हवे होते. परंतु गावातील लोक तिला 'पिची कोठी' (मानसिक रोगी, माकड) म्हणून टोमणे मारायचे. यामागील मुख्य कारण म्हणजे तिची शरीरयष्टी. परंतु, तिने पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांच्या टिकेला उत्तर दिले आहे. जाणून घेवूयात तिच्या संघर्षमय जीवनाबद्दल...

गावकऱ्यांनी दिला होता अनाथ आश्रमात पाठवण्याचा सल्ला

दीप्तीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिचा जन्म सूर्यग्रहणाच्या वेळी झाला होता. लहानपणापासूनच तिचे डोके सामान्य मुलांपेक्षा खूपच लहान होते. इतकेच नाही तर दीप्तीचे नाक आणि ओठही इतरांपेक्षा थोडे वेगळे होते. यामुळेच गावकरी तिला 'पिची कोठी' म्हणत त्रास द्यायचे. दीप्ती जीवनजीला गावकऱ्यांचे हे शब्द फार वाईट वाटले. एकटी बसून ती अनेकदा रडायची. एवढेच नाही तर लोक त्याच्या आईला ती वेडी असल्याचे सांगायचे. यासह दीप्तीला गावकरी अनाथाश्रमात पाठवण्याचा सल्ला देत असे.

यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये पदकाची मिळवून तिने आपल्या दमदार कामगिरीतून सर्वांच्या टिकेला उत्तर दिले आहे. आज संपूर्ण जग तिचे कौतुक करत आहे. तिने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेदरम्यान अवघ्या 55.82 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. दीप्ती जीवनजी ही आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील कलेडा गावाची रहिवाशी आहे. तिच्या वडिलांचे नाव जीवनजी यादगिरी आणि आईचे नाव जीवनजी धनलक्ष्मी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचा जन्म बौद्धिक अपंगत्वाने झाला होता. यावर मात करत तिने आपल्या प्रवासात अडथळा ठरू दिला नाही.

घरची परिस्थिती बिकट

दीप्तीच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिच्या घरची परिस्थिती खूपच वाईट होती. सासरे वारल्यावर परिस्थिती बिकट झाली. परिस्थिती अशी पोहोचली की तिच्या पतीला आपली काही शेतीही विकावी लागली. एवढेच नाही तर पतीच्या कमी उत्पन्नामुळे तिला नोकरीही करावी लागली. यावेळी दीप्तीसोबत तिची धाकटी बहीण अमुल्यही कामात मदत करत करायची.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news