Neeraj Chopra new Record : नीरजने स्वत:चाच टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडीत काढला

Neeraj Chopra new Record
नीरज चोप्राने मंगळवारी झालेल्या भालाफेक पात्रता फेरीत आश्चर्यकारक कामगिरी केली. Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neeraj Chopra new Record : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ब गटात असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर अंतर पार करून दिमाखात अंतिम फेरीत गाठली. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी 84 मीटरपेक्षा जास्त फेक करणे आवश्यक होते, हे लक्ष्य नीरजने आरामात पार केले.

नीरजचा हा या मोसमातील सर्वोत्तम थ्रो आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने 87.58 मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले होते. एकूणच नीरजने त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडीत काढला आहे.

नीरजला सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. सध्या सुरू असलेल्या पॅरिस गेम्समध्येही तो पदक जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो 2 ऑलिम्पिक पदकांसह निवडक भारतीय खेळाडूंच्या यादीत सामील होईल. वैयक्तिक स्पर्धेत आतापर्यंत नॉर्मन प्रिचार्ड, सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर यांनी भारतासाठी 2-2 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार

नीरजशिवाय पाकिस्तानच्या अशर्द नदीमनेही पहिल्याच प्रयत्नात 86.59 मीटर दूर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अशा प्रकारे ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे.

तर नीरज ठरणार ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील 5वा भालाफेकपटू

नीरज आता 90 मीटर किंवा त्याच्या पेक्षा जास्तीचे अंतर कापण्याचा प्रयत्न करेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्या नीरजकडून यावेळीही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे. यावेळीही नीरज चोप्रा सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरला तर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो जगातील पाचवा भालाफेकपटू ठरू शकतो. त्याच्या आधी एरिक लेमिंग (स्वीडन 1908 आणि 1912), जॉनी मायरा (फिनलंड 1920 आणि 1924), चोप्राची मूर्ती जॅन झेलेंजी (चेक प्रजासत्ताक 1992 आणि 1996) आणि अँड्रियास टी (नॉर्वे 2004 आणि 2008) यांनी अशी कामगिरी केली होती.

पहिल्या प्रयत्नानंतर नीरजने पुढे सहभाग घेतला नाही

ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सनेही चमकदार कामगिरी केली आणि तो पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पीटर्सच्या भाल्याने पहिल्याच प्रयत्नात 88.63 अंतर पार केले. ब गटातून थेट पात्र ठरणारा तो तिसरा ॲथलीट ठरला. नीरज पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर नीरज आणि अर्शद यांनी पात्रता फेरीत आणखी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्या प्रयत्नात भालाफेक करायला आले नाहीत.

ब गटातून कोण पात्र ठरले?

नीरज व्यतिरिक्त ब गटातून माजी विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स (88.63), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम (86.59), ब्राझीलचा लुईस मॉरिसिओ दा सिल्वा (85.91) आणि मोल्दोव्हाचा एड्रियन मॅराडियर (84.13) हे थेट अंतिम फेरीत पोहोचले.

किशोर जेनाला अंतिम फेरीची हुलकावणी

किशोर जेना हा पात्रता गट-अ मध्ये होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात 80.73 मीटरचे अंतर पार केले. यानंतर त्याने दुस-या प्रयत्नात फाउल केला. तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने 80.21 मीटर दूर भाला फेकू शकला. अशा स्थितीत तो थेट फायनलसाठी पात्र होण्यापासून मुकला. त्याच्या गटातील इतर चार खेळाडू 84 मीटरपेक्षा जास्त दूर भाला फेकण्यात यशस्वी झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news