पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पुणे येथे झालेल्या सामना न्यूझीलंडने आज (दि. २६) ११३ धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या. तर भारताला पहिल्या डावात १५६ धावांवर रोखले. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 255 धावांपर्यंत मजल मारत टीम इंंडियासमोर जिंकण्यासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते;पण भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. (IND VS NZ Test)
दुसर्या कसोटीमध्ये न्यूझीलंड संघाने तीन दिवसांत भारताचा पराभव करत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडीही घेतली आहे. ३५९धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला.
भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७७ धावा केल्या. यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. याशिवाय रवींद्र जडेजाने 42 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय अन्य कोणताही फलंदाज २५ पेक्षा अधिक धावा करु शकतला नाही. कर्णधार रोहित शर्मा आठ धावा करून बाद झाला, शुभमन गिल २३ धावा करून बाद झाला, विराट कोहली १७ धावा करून बाद झाला, ऋषभ पंत खाते न उघडता बाद झाला, सर्फराज खान नऊ धावा करून बाद झाला आणि रविचंद्रन अश्विन बाद झाला. 18 धावा केल्यानंतर. आकाश दीप एक धाव करू शकला आणि जसप्रीत बुमराह 10 धावा करून नाबाद राहिला.
टीम इंडियाला पहिला धक्का कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने बसला. रोहित शर्माने 16 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 8 धावा केल्या. तो मिचेल सँटनरच्या चेंडूवर बाद झाला. भारताला दुसरा धक्का 96 धावांवर बसला. शुभमन गिल 31 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याने यशस्वी जैस्वालसोबत दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावामध्ये आक्रमक फलदाजी करताना यशस्वी जैस्वाल बाद झाला. त्याने दुसऱ्या डावात 65 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. सॅन्टनरने त्याला मिशेलकरवी झेलबाद केले.विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील अपयशाची मालिका पुणे कसोटीतील दुसर्या डावातही कायम राहिली. त्याला १७ धावांवर सँटनरने पायचीत केले. १४७ धावांवर भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. भारताला सर्फराज खानच्या रुपाने सहावा धक्का बसला. त्याने 15 चेंडूमध्ये 7 धावा केल्या. त्याला मिचेल सँटनरने क्लीन बोल्ड केले आहे. भारताला 167 धावांवर सातवा धक्का बसला. ग्लेन फिलिप्सने वॉशिंग्टन सुंदरला विल यंगकरवी झेलबाद केले.सँटनरने अश्विनला झेलबाद करत भारताला आठवा धक्का दिला. अश्विन १८ धावा काढून माघारी परतला. आकाश दीप एक धाव करू शकला. रवींद्र जडेजाने 42 धावांची खेळीनंतर विकेट गमावली. आणि जसप्रीत बुमराह 10 धावावर नाबाद राहिला.
तिसऱ्या दिवसाच्या पहिले सत्रामध्ये भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंड्च्या फलंदाजांना बोटावर नाचवले. भारतीय गोलंदाजीने न्यूझीलंडला 255 धावांवर ऑलआउट केले. आता विजयासाठी भारतीय फलंदाजांना 358 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. दुसऱ्या दिवशी 301 धावांची आघाडी आणि 5 गडी शिल्लक असूनही न्यूझीलंडला दुसऱ्या डावामध्ये फक्त 57 धावा जोडता आल्या. तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना न्युझीलंडकडून टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी डावाची सुरुवात केली. त्यामध्ये फिलिप्सने नाबाद 82 धावा केल्या. त्यानंतर ब्लंडेल (41), सँटनर (4), पटेल (1) आणि साऊदी याला खाते देखील उघडता आले नाही. रवींद्र जडेजाने ओ'रुर्केला धावबाद करून न्यूझीलंडची 10वी विकेट घेतली. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात एकूण 255 धावा केल्या. त्याने टीम इंडियाविरुद्ध 358 धावांची आघाडी घेतली. भारताला जिंकायचे असेल तर त्यांना 359 धावा कराव्या लागतील.