धोनी गंभीर जखमी? मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता (Video)

MS Dhoni Injury Video : हॉटेलमध्ये लंगडतानाचा Video व्हायरल
MS Dhoni Injury Video
एमएस धोनी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Injury : आयपीएलचा सध्याचा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी काही खास राहिलेला नाही. सीएसकेला पहिल्या 7 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. दरम्यान, संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाबाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या अनुपस्थितीत एमएस धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, सोमवारी (14 एप्रिल) सीएसकेने लखनौ ऋषभ पंतच्या लखनौ संघाविरुद्ध शानदार विजय नोंदवला. दरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचे चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

धोनीला दुखापत झाली?

आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या 30 व्या सामन्यात सीएसकेचा काळजीवाहू कर्णधार एमएस धोनीने जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात त्याने एलएसजीविरुद्ध शेवटच्या षटकात मॅच फिनिशरची उत्तम खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर सीएसकेने हंगामातील दुसरा विजय नोंदवला. सामना संपल्यानंतर संघाचे खेळाडू हॉटेलमध्ये गेले असता तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण यावेळी धोनी लंगडताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यादरम्यान धोनीला पायाच्या दुखापतीचा सामना करावा लागला. पण तरीही त्याने लढावू वृत्तीने मैदान गाजवले. सामना संपल्यानंतरही त्याला वेदना होत असल्याचे दिसून आले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. अशा परिस्थितीत, जर धोनीची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्यास चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसू शकतो. तथापि, त्याच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार नाही?

येत्या रविवारी (20 एप्रिल) चेन्नई आणि मुंबई यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार असून धोनी या सामन्यात खेळेल की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. पण सध्या चेन्नई सुपर किंग्जने धोनीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. जर धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर तो आगामी सामन्यांमधून बाहेर पडू शकतो.

चेन्नईकडून धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने 11 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावा फटकावून नाबाद राहिला. धोनीच्या या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

गायकवाड दुखापतीमुळे बाहेर

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी, सीएसकेने आयुष म्हात्रेला संघात समाविष्ट केले आहे. या हंगामात सीएसकेने सलग पाच सामने गमावले आहेत. पण त्यानंतर सीएसकेने लखनौविरुद्ध चांगली कामगिरी करत विजयी पुनरागमन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news