पुढारी ऑनलाईन डेस्क: आयपीएल २०२५ च्या हंगामाला आजपासून (दि.२२) सुरूवात होत आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा उद्घाटन समारंभ कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर झाला. आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, गायक श्रेयाल घोषाल आणि करण औजला आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या उपस्थितीत एका शानदार उद्घाटन समारंभाला प्रारंभ झाला. ( indian premier league)
उद्घाटन समारंभात शाहरुख खानने विराट कोहलीला डान्स करण्याची विनंती केली. दोघांनीही पठाण चित्रपटातील 'झूमे जो पठाण' गाण्यावर नाच करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर शाहरुखने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आणि कलाकारांना स्टेजवर बोलावले. आयपीएलच्या १८ हंगामांच्या पूर्ततेबद्दल बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी विराट कोहलीला स्मृतिचिन्ह भेट दिले. उद्घाटन समारंभाच्या शेवटी, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे ट्रॉफी घेऊन मंचावर आले.
आयपीएलच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात शाहरुख खानने प्रेक्षकांची संवाद साधला. त्यानंतर बॉलिवूड गायिका श्रेया घोषालच्या सादरीकरणाने झाली. श्रेयाने तिच्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. श्रेया घोषालने सादर केलेल्या पुष्पा २ मधील गाण्यावर काेलकातावासी थिरकले. यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने नृत्य लक्षवेधी ठरले. पंजाबी गायक करण औजला यांनी कार्यक्रमात रंगत आणली.शाहरुखने रिंकू सिंग आणि विराट कोहलीसोबत नाच केला. गतविजेत्या केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार हे चमकदार आयपीएल ट्रॉफीसह मंचावर आले. शाहरुखसोबत स्टेजवर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, दिशा पटानी, श्रेया घोषाल, करण औजला, रहाणे आणि पाटीदार होते. आयपीएलच्या १८ व्या हंगामानिमित्त केक कापण्यात आला आणि आयपीएल २०२५ चे उद्घाटन आतषबाजीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गायले गेले. ( IPL 2025 Opening Ceremony Live)