IND vs BAN Test : अश्विनचे ​​धमाकेदार शतक! जडेजा-यशस्वीचे अर्धशतक, भारत 6 बाद 339

अश्विन-जडेजा मैदानावर; भारत ६ बाद १७६
IND vs BAN Test
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला आज (दि.१९ सप्टेंबर) सुरुवात झाली.Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामन्याला आज (दि.१९ सप्टेंबर) झाली आहे. ( india vs bangladesh test ) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सकाळी ९.३० सामन्याला सुरूवात झाली. बांगलादेशला आतापर्यंत एकाही सामन्यात भारताला पराभूत करता आलेले नाही. ICC कसोटी चॅम्पियनशिपच्‍या गुणतालिकेत अग्रस्‍थानी राहण्‍यासाठी भारतासाठी ही मालिका महत्त्‍वपूर्ण आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत बांगलादेशने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला

भारत आणि बांगलादेश यांच्यातील चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने 6 गडी गमावून 339 धावा केल्या आहेत. भारतासाठी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी चांगली फलंदाजी करत सातव्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली.

भारताच्या 300 धावा

अश्विन आणि जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या शानदार भागीदारीमुळे भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 300 धावा पूर्ण केल्या आहेत

अश्विन-जडेजा यांच्यात 150 शतकी भागीदारी

अश्विन आणि जडेजाची शानदार फलंदाजी सुरूच असून दोन्ही फलंदाजांनी सातव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. अश्विन शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. तर जडेजानेही 65 हून अधिक धावा केल्या आहेत.

अश्विन-जडेजा मैदानावर; भारत ६ बाद १७६

पहिल्या दिवशी टी-ब्रेकपर्यंत भारताने सहा गडी गमावून १७६ धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात भारताने २३ षटकांत ३ गडी गमावून ८८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात भारताने २५ षटकात ८८ धावा करत तीन विकेट गमावल्या. सध्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. जडेजा १७ चेंडूत ७ धावा करून नाबाद आहे. तर, अश्विन १९ चेंडूत २१ धावा करून नाबाद आहे. पहिल्या सत्रात भारताने रोहित शर्मा (६), शुभमन गिल (०) आणि विराट कोहली (६) यांच्या विकेट्स गमावल्या. त्याचवेळी दुसऱ्या सत्रात भारताने ऋषभ पंत (३९), यशस्वी जैस्वाल (५६) आणि केएल राहुल (१६) यांच्या विकेट्स गमावल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने चार बळी घेतले. तर नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारताला सहावा धक्का; यशस्वी जैस्वाल बाद

१४४ धावांवर भारताला दोन धक्के बसले. प्रथम यशस्वी जैस्वालला वेगवान गोलंदाज नाहिद राणाने स्लिपमध्ये झेलबाद केले. जैस्वालने ११८ चेंडूत ५६ धावा केल्या. यानंतर केएल राहुलला मेहदी हसन मिराजने झाकीर हसनच्या हाती झेलबाद केले. राहुलने १६ धावा केल्या.

भारताला पाचवा धक्का

भारताने १४४ धावांवर पाच विकेट गमावल्या आहेत. यशस्वी जैस्वाल ११८ चेंडूत ५६ धावा करून बाद झाली. त्याला नाहिद राणाने स्लिपमध्ये शादमान इस्लामकरवी झेलबाद केले.

यशस्वी जैस्वालचे झुंझार अर्धशतक

एकीकडे दिग्‍गज फलंदाज अपयशी ठरत असताना यशस्‍वी जैस्‍वालने पले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने कारकिर्दीतील ५वे अर्धशतक झळकावले आहे.

हसनने दिला भारताला चौथा धक्का; रिषभ ३९ धावांवर बाद

सामन्याच्या २६ व्या षटकात हसनने रिषभ पंतच्या रूपात भारताचा चौथा फलंदाज बाद झाला. त्याने रिषभला विकेटकीपर लिटन दासकरवी झेलबाद केले. रिषभने आपल्या खेळीत ५२ चेंडूत ६ चौकारांच्या सहाय्याने ३९ धावा केल्या.

लंचपर्यंत भारत तीन बाद ८८

बांगला देश विरूद्धच्या सामन्यात भारताची सुरूवात खराब झाली कर्णधार रोहित, गिल आणि विराट कोहली अवघ्या ३४ धावांवर बाद झाला. गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी करत बांगला देशच्या हसन महमूदने भारताच्या तिन्ही फलंदाजांना बाद केले. सध्या रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी डाव सावरला आहे. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ८३ बॉलमध्ये ५४ धावांची भागिदारी केली आहे.

भारताला तिसरा धक्का

भारताला ३४ धावांवर तिसरा धक्का बसला. डावाच्या १०व्या षटकात हसन महमूदने विराट कोहलीला यष्टिरक्षक लिटन दासकडे झेलबाद केले. विराटला सहा धावा करता आल्या. यापूर्वी हसनने कर्णधार रोहित शर्मा (६) आणि शुभमन गिल (०) यांना बाद केले. सध्या ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. 10 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा आहे.

भारताला दुसरा धक्का

२८ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. डावाच्या आठव्या षटकात शुभमन गिलही बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. हसम महमूदने त्याला यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद केले. यापूर्वी हसनने रोहितला बाद केले होते.

भारताला पहिला धक्का; कर्णधार रोहित तंबूत परतला

सामन्याच्या पाचव्या षटकात कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताचा पहिला फलंदाज बाद झाला. त्याला बांगला देशचा गोलंदाज हसन महमूदने शांतोकरवी झेलबाद केले. रोहितने आपल्या खेळीत चौकाराच्या सहाय्याने १९ चेंडूत ६ धावांची खेळी केली.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news