पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा नियमीत कर्णधार रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रोहित 24 नोव्हेंबरला पर्थमध्ये टीम इंडियामध्ये सामील होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो पर्थला पोहोचण्याची शक्यता आहे. रोहित सध्या त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळत नाहीये. मात्र, तो ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल.
टीम इंडिया दोन बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना झाली होती. पहिली बॅच 9 नोव्हेंबरला आणि दुसरी बॅच 11 नोव्हेंबरला पर्थला गेली. रोहित शर्मा 15 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा पिता झाला. याच कारणामुळे तो सध्या सुट्टीवर आहे. बीसीसीआययने याबाबत त्याला परवानगी दिली आहे. दरम्यान, तो 22 नोव्हेंबरपासून सुरू होणा-या पर्थ कसोटीसाठी संघात नसेल. त्याच्या जागी जसप्रित बुमराह संघाचे नेतृत्व करणार आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत संघाची धुरा सांभाळणार आहे. पर्थ कसोटी सुरू होण्यापूर्वी रोहितबद्दल अपडेट देताना बुमराह म्हणाला, ‘मी रोहितशी याआधी बोललो होतो. पण येथे आल्यानंतर मला संघाचे नेतृत्व करण्याबाबत काही स्पष्टता आली. मी याकडे पद म्हणून पाहत नाही. मला जबाबदारी आवडते. हे माझ्यासाठी आव्हान आहे.’