Ravi Shastri : कोहली गांगुलीच्या वादात रवी शास्त्री यांनी घेतली उडी - पुढारी

Ravi Shastri : कोहली गांगुलीच्या वादात रवी शास्त्री यांनी घेतली उडी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सध्या टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर असून संघाने दोन कसोटी सामन्यातील एक सामना जिंकत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. तर दुसऱ्या सामना अत्यंत रोमांचक वळणावर येऊन पोहचला आहे. या दौऱ्यापूर्वीच आघाडीचा फलंदाज विराट कोहली ( Virat kohli ) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली ( sourav ganguly ) यांच्यात चांगला वाद रंगला होता. या वादाचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच आता माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri ) यांनी या वादत उडी घेतली आहे. रवी शास्त्री यांनी हा वाद संपविण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला देखिल दिला आहे.

या वादात रवी शास्त्री ( Ravi Shastri ) यांनी उडी घेत पुन्हा एकदा शास्त्री हे विराट कोहलीच्या मदतीला धावून आल्याचे देखील म्हटले जात आहे. कर्णधार विराट कोहली ( Virat kohli ) याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. टी-२० विश्वकपनंतर त्याने कर्णधापद सोडले देखिल. पण, नंतर बीसीसीआयने त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरुन देखिल हटवले. यानंतर विराट कोहली ( Virat kohli ) या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्याने बीसीसीआयच्या निर्णयावर बोट ठेवत मला पूर्व कल्पना न देता असा निर्णय घेण्यात आले असं म्हणत हा वाद चव्हाट्यावर आणला.

या वादावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( sourav ganguly ) यांनी स्पष्टीकरण दिले की, मी विराट ( Virat kohli ) टी-२० संघाचे कर्णधार पद सोडण्याचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर विराटने पुन्हा मला पुनर्विचार करण्यातबाबत बीसीसीआयने सांगितले नसल्याचे म्हणत या वादाला तोंड फोडले होते.

या प्रकरणाबाबत मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा ( chetan sharma ) म्हणाले की, टी-२० कर्णधारपद सोडण्याचे विराटने ( Virat kohli ) जेव्हा सांगितले तेव्हा सर्वांना धक्का बसला. त्यावेळी आम्ही या निर्णयावर पुन्हा विचार करण्यास सांगितले होते. शिवाय निवड समिती आणि बीसीसीआयला असे वाटत होते की, मर्यादित षटकांच्या सामन्यांचा कर्णधार हा एकच असावा त्यामुळे विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरुन देखिल हटविण्यात आले.

हा वाद शमतो न शमतो तोच माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri ) यांनी या वादात उडी घेतली आहे. माध्यमांशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, चांगल्या संवादाने या वादाला संपुष्टात आणले जावू शकते. विराट कोहली ( Virat kohli ) याने त्याची बाजू मांडली आहे. आता या मुद्द्यावर सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. प्रश्न असा नाही की कोण खोटं बोलत आहे ? तर खरा प्रश्न असा आहे की, नेमके सत्य काय आहे. माझ्या सोबत सर्वांना सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे. तसेच चांगल्या संवादाने दोन्ही बाजूने संवाद होऊन या वादावर पडदा टाकणे शक्य आहे.

Back to top button