IND vs SA : द. आफ्रिकेला विजयासाठी 122 धावा, तर टीम इंडियाला 8 विकेट्सची गरज | पुढारी

IND vs SA : द. आफ्रिकेला विजयासाठी 122 धावा, तर टीम इंडियाला 8 विकेट्सची गरज

जोहान्सबर्ग : पुढारी ऑनलाईन

जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला असून दक्षिण आफ्रिकेने 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 बाद 118 धावा केल्या आहेत. कर्णधार डीन एल्गर (46) आणि रायसी व्हॅन डर ड्युसेन (11) नाबाद आहेत. एडन मार्कराम 31 आणि कीगन पीटरसन 28 धावांवर बाद झाले. सामन्याला अजून दोन दिवस बाकी असून आफ्रिकन संघाला सामना जिंकण्यासाठी 122 धावा करायच्या आहेत. तर टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्सची गरज आहे.

आफ्रिकेने पहिली विकेट ४७ आणि दुसरी विकेट 93 धावांवर गमावली. परंतु संघाचा कर्णधार डीन एल्गर एक बाजू धरून टीच्चून फलंदाजी करत आहे. एल्गर आणि डुसेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 76 चेंडूत 25 धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी, टीम इंडियाचा दुसरा डाव 266 धावांवर आटोपला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 240 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 58 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 53 आणि हनुमा विहारीने नाबाद 40 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जेन्सेन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

अश्विनने यश मिळवून दिले…

रविचंद्रन अश्विनने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने कीगन पीटरसन आणि डीन एल्गर यांच्यातील भागिदारी मोडली. पीटरसन ४४ चेंडूत २८ धावा काढून बाद झाला. त्याने एल्गरसोबत १०४ चेंडूत ४६ धावांची भागीदारी केली.

मार्करम बाद, शार्दुल ठाकूरचे यश…

पहिल्या डावात हिरो ठरलेल्या शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. त्याने १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एडन मार्करामला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि द. आफ्रिकेची सलामीची भागीदारी मोडली. मार्करामने ३८ चेंडूत ३१ धावा केल्या.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला असून दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २४० धावा कराव्या लागणार आहेत. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला २०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग केवळ एकदाच करता आला आहे. आफ्रिकन संघाने २००६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २२० धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचवेळी, त्यांच्याच भूमीवरही आफ्रिकन संघाला केवळ दोनदाच २३७ हून अधिक धावांचे लक्ष्य गाठता आले आहे. जोहान्सबर्गच्या मैदानावर भारताने एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या सामन्यातही टीम इंडियाच्या गोलंदाजांना हा विक्रम कायम राखण्याची संधी आहे. भारतासाठी तिसऱ्या दिवशी रहाणे आणि पुजाराने शानदार सुरुवात करून शतकी भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला चांगल्या स्थितीत पोहचण्यात मदत झाली. मात्र, यानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत भारताचा डाव २६६ धावांत गुंडाळला.

भारताची शेवटची विकेट पडली

लुंगी एनगिडीने भारताची शेवटची विकेट घेतली आणि टीम इंडियाचा डाव २६६ धावांवर आटोपला. त्याने सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव संपवला. सिराजला आपले खातेही उघडता आले नाही आणि तो शुन्यावर बाद झाला. दुसऱ्या टोकाला हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला.

भारताची नववी विकेट पडली…

कागिसो रबाडाने ५६.२ व्या षटकात भारताला नववा धक्का दिला. त्याने जसप्रीत बुमराहला मार्को जॉन्सनकरवी झेलबाद केले. बुमराहने १४ चेंडूत सात धावा केल्या.

शमी बाद, आठवा धक्का..

२२८ वर भारताला आठवा धक्का बसला. ५१.५ व्या षटकात मार्को जेन्सने मोहम्मद शमीला बाद केले. शमी ६ चेंडू खेळून एकही धाव काढू शकला नाही. यावेळी भारताची धासंख्या २२८ होती.

शार्दुल ठाकूर बाद, भारताची सातवी विकेट

शार्दुल ठाकूरच्या रुपात भारताला सातवा झटका बसला. त्याला मार्को जेन्सनने 49.6 व्या षटकात बाद केले. बॉन्ड्रीलाईनवर केशव महाराजने याचा झेल पकडला.शार्दुलने ५ चौकार १ षटकार ठोकत २४ चेंडूत २८ धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या २२५ होती.

भारताची धावसंख्या २०० पार…

भारताची धावसंख्या सहा गडी गमावून २०० च्या पुढे गेली आहे. शार्दुल ठाकूर आणि हनुमा विहारी क्रीजवर आहेत. उपाहारानंतरही भारतासाठी वेगवान धावा आल्या आहेत. शार्दुल मुक्तपणे त्याचे शॉट्स खेळत आहे. तर हनुमा विहारी सावधपणे फलंदाजी करत आहे.

भारताची आघाडी १५० पार…, सहावा धक्का

भारतीय संघाच्या आघाडीने १५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. अर्धी टीम इंडियाची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली असली तरी अश्विन आण्इ हनुमा विहारी संघाचा डाव सावरतील असा विश्वास होता पण लुंगि एन्गिडीने भारताला सहावा झटका दिला. त्याने अश्विनने बाद केले. विकेटच्या मागे व्हेरेन याने अश्विनचा झेल पकडला. यावेळी भारताची धावसंख्या १८४ होती. अश्विनने २ चौकारांचुआ मदतीने १४ चेंडूत १६ धावा केल्या.

पाचवा झटका… ऋषभ पंत बाद..

३८.३ व्या षटकात कागिसो रबाडाने भारताला पाचवा धक्का दिला. ऋषभ पंत त्याचा बळी ठरला. पंतला खातेही उघडता आले नाही आणि तो शुन्यावर बाद झाला. आफ्रिकन संघाने योजनाबद्धरित्या त्याला माघारी धाडले. पहिल्यांदा शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या एका खेळाडूने त्याच्यासोबत स्लेजिंग केले. त्यानंतर रबाडाने एक बाउन्सरने टाकून पंतवर दबाव टाकला. दोन चेंडू खेळल्यानंतर पंत अस्वस्थ झाला आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. रबाडाने ठरल्याप्रमाणे चेंडू त्याच्यापासून दूर ठेवला आणि चेंडू पंतच्या बॅटच्या बाहेरच्या काठावर जाऊन यष्टीरक्षक व्हेरेनपर्यंत पोहोचला.

Image

पुजारा बाद…

३७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताला आणखी एक म्हणजेच चौथा धक्का बसला. चेतेश्वर पुजारा माघारी परतला. त्याला रबाडाने एलबीडल्यू करून पॅव्हेलियचा रस्ता दाखवला. पुजारानेही रिव्ह्यू घेत विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो पंचांचा निर्णय बदलू शकला नाही. रबाडाचीही दुसरी विकेट आहे. पुजाराने १० चौकारांच्या मदतीने ८६ चेंडूत ५३ धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या १६३ होती.

भारताची तिसरी विकेट…

३५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताला तिसरा झटका बसला. अर्धशतकी खेळी करणा-या अजिंक्य रहाणेला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. रबाडाने त्याला विकेटकीपर व्हेरेने करवी झेलबाद केले. रहाणेने ८ चौकार १ षटकाराच्या मदतीने ७८ चेंडूत ५८ धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या १५५ होती. पुजारासह रहाणेने १११ धावांची भागिदारी केली.

रहाणेचे अर्धशतक…

चेतेश्वर पुजारानंतर अजिंक्य रहाणेनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ६७ चेंडूत ५२ धावा केल्या. रहाणेनेही या सामन्यात वेगवान फलंदाजी केली. या अर्धशतकी खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे २४ वे अर्धशतक आहे. रहाणे-पुजारा यांच्यात शतकी भागीदारीही पूर्ण झाली.

पुजारा-राहणेची शतकी भागीदारी..

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी ११२ चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि टीम इंडियाला अधिक चांगल्या स्थितीत आणले आहे. बऱ्याच कालावधीनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

पुजाराने कारकिर्दीतील ३२ वे अर्धशतक झळकावले…

भारताचा मधल्याफळीतील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३२ वे अर्धशतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने अतिशय वेगवान धावा केल्या आहेत. पुजाराने ६२ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने १० चौकार मारले. पुजारावर या सामन्यात मोठी खेळी खेळण्याचे दडपण होते आणि त्याने कठीण परिस्थितीतही चांगली फलंदाजी केली आहे. आता त्याला या खेळीचे मोठ्या शतकात रूपांतर करायचे आहे.

भारताची आघाडी १०० पार…

भारतीय संघाची आघाडी १०० पार गेले आहे. सामन्याच्या दुस-या दिवसचा खेळ संपत असताना भारताला झटपट दोन झटके बसले. यावेळी संघाची धावसंख्या ४४ होती. कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने दबाव वाढला होता. पण क्रिजवर असणा-या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला. काल खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या २ बाद ८५ पर्यंत पोहचवली आणि आज पहिल्या सत्रात दोघांनी आक्रमक पवित्रा घेत अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. तसेच संघाची आघाडी १०० पार नेली.

पुजारा आणि रहाणेची आक्रमक फलंदाजी…

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या दिवशी चांगलीच आक्रमक सुरुवात केली. हे दोघेही सातत्याने मोठे शॉट्स खेळताना दिसले. त्यांनी दुसऱ्या डावात १५ ते २५ षटकांत ५३ धावा जोडल्या. पुजारा आणि रहाणेने अर्धशतकी भागिदारी केली. या दोघांनी प्रत्येक शॉर्ट बॉलवर आणि फॉरवर्ड बॉलवर उत्कृष्ट चौकार मारले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सत्रात याच पद्धतीने फलंदाजी केल्यास सामना आफ्रिकेच्या पकडीतून सहज निघून जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुजारा आणि रहाणे यांच्यात अर्धशतकी भागिदारी..

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली असून संघाचा डाव सावरला आहे. पुजाराने या डावात खूप वेगाने धावा केल्या. तर रहाणे सावधपणे फलंदाजी करत आहे.

 

Back to top button