IPL 2024 : RCB vs RR सामन्यात दहशतवादी हल्ल्याची भीती! विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका, 4 जणांना अटक

IPL 2024 : RCB vs RR सामन्यात दहशतवादी हल्ल्याची भीती! विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका, 4 जणांना अटक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही वेळातच रंगणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमनेसामने असतील. दरम्यान, या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे समोर आले आहे. त्याला धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आरसीबीने सामन्यापूर्वीचे सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द केली. मात्र या प्रकरणाबाबत बीसीसीआय किंवा आरसीबीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

दहशतवादी कारवायांच्या संशयावरून चौघांना अटक

सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका आहे. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचे सराव सत्र रद्द केले आणि दोन्ही संघांनी पत्रकार परिषद न घेण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री अहमदाबाद विमानतळावरून चार जणांना अटक केली. पोलिसांनी चार आरोपींच्या लपण्याच्या ठिकाणाची झडती घेतल्यानंतर शस्त्रे, संशयास्पद व्हिडिओ आणि मजकूर संदेश जप्त केल्याची माहिती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2024 एलिमिनेटरच्या आधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे एकमेव सराव सत्र रद्द केले होते. नॉकआऊट सामन्याच्या तयारीसाठी आरसीबी मंगळवारी अहमदाबादमधील गुजरात कॉलेज मैदानावर सराव करणार होता, परंतु संघाने कोणतेही अधिकृत कारण न देता ते रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने त्याच ठिकाणी नेट सराव केला. तथापि, कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही.

सामन्यापूर्वी दोन्ही संघ ज्या मैदानावर सामना खेळणार आहे त्याच मैदानावर सराव करतात. पण राजस्थान आणि बेंगळुरूच्या बाबतीत असे घडले नाही, कारण आयपीएल क्वालिफायर 1 कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात मंगळवारी त्याच मैदानावर खेळला गेला आणि म्हणून ते मैदान राजस्थान आणि बेंगळुरू या संघांसाठी उपलब्ध नव्हता. गुजरात कॉलेजचे मैदान आरसीबी आणि आरआरच्या संघांना पर्याय म्हणून देण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news