Yashasvi vs Virat : अवघ्या 8 व्या कसोटीत जैस्वाल मोडणार कोहलीचा ‘हा’ विक्रम!

Yashasvi vs Virat : अवघ्या 8 व्या कसोटीत जैस्वाल मोडणार कोहलीचा ‘हा’ विक्रम!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi vs Virat : यशस्वी जैस्वालची बॅट तळपत आहे. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचेच लक्षवेधून घेतले आहे. या युवा फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध आपल्या स्फोटक कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. रोहित शर्माची आक्रमकता त्याच्या फलंदाजीत दिसत असतानाच तो विराट कोहलीसारखा तंत्रशुद्ध शॉट्स मारण्यातही माहीर आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार कामगिरी केली आणि त्यानंतर टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे तो टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमधील महत्त्वाचा दुवा बनला आहे. अशातच तो आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो कोहलीचा मोठा विक्रम मोडू शकतो.

कोहलीचा विक्रम निशाण्यावर (Yashasvi vs Virat)

विराट कोहलीने 2011 मध्ये टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत केवळ 26 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, 22 वर्षीय यशस्वी जैस्वालने भारतीय संघासाठी आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांच्या 13 डावांमध्ये 25 षटकार ठोकले आहेत. यशस्वी ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो कोहलीचा विक्रम सहज मोडू शकतो. कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी जयस्वालला फक्त दोन षटकारांची गरज आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध 'यशस्वी' पदार्पण (Yashasvi vs Virat)

जैस्वालने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावले. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजीचा नमुना सादर करत सलग दोन द्विशतके फटकावली. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात 209 आणि तिसऱ्या कसोटीत 214 धावांची खेळी केली.

जैस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये

जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावताना आपल्या डावात 12 षटकार ठोकले. कसोटी सामन्याच्या एका डावात इतके षटकार मारण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या आधी वसीम अक्रमनेही एका कसोटी डावात 12 षटकार ठोकले होते. यशस्वीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमध्ये 861 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने भारतीय संघासाठी 17 टी-20 सामन्यांमध्ये 502 धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news